Sunday, September 23, 2012

यशाचे "सुलभ" टर्निंग पॉइण्टस - निलेश गोरे,

published in Sakal's Career Mantra (17/9/2012),
published on Jalgaonlive.com on 20/9/2012
published in saimat on 21/9/2012


आज अब्जपती लोकांच्या कहाण्या वाचणारे व त्यांच्याप्रमाणे उत्तुंग यश मिळविन्याचे स्वप्न पाहाणारे करोडो-करोडो लोक आहेत पण म्हणतात ना यश त्यालाच मिळते जो काहीतरी डिफ्रेंट करत असतो.  असाच एक डिफरेन्स एका व्यक्तीने घडवून आणला, आज तो फक्त करोडपतीच नव्हे तर करोडो लोकांच्या हृदयात सामावला आहे. माफ करा, मी कोण्या फिल्म स्टार बद्दल बोलत नाहीये, मी बोलतोय ते एका जिगरबाज व्यक्तीच्या अशा करियर बद्दल ज्याने क्रांतीचे रूप धारण केले, ती क्रांती ज्याचा धडा आज जगभरातील १८ देश घेत आहेत. ती व्यक्ती आणि क्रांती कोणती ते स्टेप-बाय-स्टेप पुढे उलगडेलच.

असा सुरू झाला प्रवास यशाचा...

ही "सक्सेस स्टोरी" आहे अशा एका सुशिक्षित पदवीधराची ज्याला त्याचे स्वप्न साकारण्यासाठी बिना-पगाराची नौकरी करावी लागली, उपासमार, अपमान, निन्दा यांना सामोरे जावे लागले. स्वप्न होते ते भंग्याना (मैला उचलणार्‍याणा) समाजाच्या प्रवाहात आणण्याचे, योग्य जीवनमान व अधिकार देण्याचे, स्वप्न होते ते स्वच्छ भारताचे. हेच त्यांचे करियर त्यांनी निच्शित केले. कारण त्याकाळी भंग्याना समाजात स्थान नव्हते, ते अछुत होते, त्यांना शिक्षण, सुविधा व अधिकार दिले जात नव्हते. त्यांची दयनिय स्थिती व त्यांना मिळणारी अमानवीय वागणूक या ध्येयवेड्याला सहन झाली नाही. अशांसाठी काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. उद्देश येथे करडो कमावण्याचा नव्हता, उद्देश होता तो हजारो लोकांना सोय-सुविधा आणि स्वच्छता देण्याचा. आणि इथून फक्त यांच्याच काय तर भारताच्या विकासाच्या व समाज परिवर्तानाच्या इतिहासाचेही टर्निंग पॉइण्ट सुरू झाले.   

कल्पना, कडवे वास्तव आणि पहिला टर्निंग पॉइण्ट
सुरुवातीला सर्वांना ही वेडेपाणाची आणि वास्तवशून्य कल्पना वाटली त्यामुळे कोणाची साथ तर सोडाच साधे समर्थनही मिळाले नाही. ईतकेच काय तर भंग्यांच्या वस्तीत राहून त्यांची जीवनशैली अनुभवण्याची वेळ देखील त्यांच्यावर आली होती. १९६८ साली हा ध्येयवेडा “भंगी मुक्ती समिती” सोबत आले आणि "मैला" उचलणार्‍यांसोबत जगातील एका अनोख्या क्रांतीची सुरवात झाली. ही क्रांती म्हणजे शौचालय क्रांती व तिचे जनक आहेत       डॉ. बिंदेश्‍वर पाठक.  हा धाडशि निर्णय घेऊन महत्वकांक्षी वाटचाल सुरू केली आणि ठरला पहिला टर्निंग पॉइण्ट.

दुसरा टर्निंग पॉइण्ट आणि कहाणी मे ट्विस्ट...
१९७० साली पाठक यांनी एका सामाजिक संस्थेची स्थापना केली व अनोख्या कार्यास सुरवात केली. प्रत्येक ठिकाणी त्यांची हेटाळणी होत होती. असंख्य संकटांना तोंड देत पाठक पुढे सरसावत होते. पटना शहारात २०० संडास बांधणे हा त्यांचा पहिला टप्पा होता. पैसा तर नव्हताच, ना शासकीय मदत. शेवटी त्यांनी एका आमदराच्या मदतीने पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पत्र लिहले. दहा दिवसानंतर पाठक यांना त्याकाळचे बिहार चे सीएम श्री केदार पांडे यांचा निरोप आला, हाच दुसरा टर्निंग पॉइण्ट ठरला, बिहार सरकार ने २५००० रु शासकीय निधी मंजूर केला, निधी ही टप्प्या-टप्प्याने मिळणार होती. काम सुरू झाले त्याचवेळी निधी देणार्‍या ऑफीसरची बदली झाली, नवीन ऑफीसर ने "हा प्रॉजेक्ट फालतू आहे" असे सांगून मदत थांबवली आणि काम बंद पडले.


तिसरा टर्निंग पॉइण्ट आणि आत्महत्या…..
स्वप्न कागदावरच राहीले होते. सदमा मोठा होता, पाठक यांना आत्महत्तेचा विचार आला पण स्वताहाला सांभाळून त्यानी औषधी विकण्याची नौकरी पतकारलि, हा फक्त एक अल्पविराम होता. विक्रीचे काम करत करत ते बिहारमधील आरा या तालुक्यात पोहचले, तिथे नगरपालिकेत उच्च पदावर काम करणार्‍या ऑफीसरशी  त्यांचा परिचय झाला आणि होता तो तिसरा टर्निंग पॉइण्ट. ऑफीसर तर्फे ५०० रुपयांचा चेक पाठक यांना मिळाला व ऑगस्ट १९७४ ला पहिला सार्वजनिक संडास निर्माण झाला. ५ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर स्वप्न साकारतांना दिसले.

चौथा टर्निंग पॉइण्ट आणि कर्तुत्वाची कमाल....
इथून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की जोपर्यंत आपण आपले कौशल्य सिद्ध करून दाखवत नाही तोपर्यंत लोक आपल्याला लायक मानत नाहीत. आरा मधल्या कामाचे लोन बाजूच्या बक्सर मधे पसरले आणि बक्सर मधला इंपॅक्ट परत पाटण्यात जाणवला. १९७० मधे अटकलेली फाइल आणि निधि परत नव्याने ३० एप्रिल १९७४ला पास झाली आणि २०००० रूपयांची मदती मिळालि व काम सुरू झाले. तीन वर्षात बिहार सरकार ने भरपूर मदत केली. १९७७ मधे डब्ल्यूएचओ ने पाठक यांच्या कामाची दखल घेतली आणि हा ठरला चौथा टर्निंग पॉइण्ट.

पाचवा टर्निंग पॉइण्ट आणि फिनिक्स भरारी.....
१९७८ मधे या संस्थेने यूपी, बंगाल, ओरिसा ई. राज्यांमधे काम सुरुकेले व काही वर्षातच ही क्रांती भारतभर पसरली. प्रत्येक ठिकाणी सरकार मदत करू न शकल्याने पाठक यांनी पेड शौचालायचा कॉन्सेप्ट राबवला. मिळेल ती संधी घेणे, स्वतःची काबिलीयत सिद्ध करणे आणि नव-नवीन सुधार घडविणे हा ठरला पाचवा टर्निंग पॉइण्ट. ही संस्था आहे "सुलभ", होय तेच नाव जे आपल्याला भारतात आज विभिन्न ठिकाणी शौचालय या शब्दापुर्वि  दिसते. प्रत्येक स्टेशन, स्टॅंड, सरकारी इमारती व पर्यटन स्थळा बाहेर दिसणारे एक सामान्य नाव "सुलभ शौचालाय".

कल्पना करा की आज आपल्याला ही सुविधा नसती तर......

१९९१ मधे त्यांना पद्म भूषण पुरस्कार मिळाला व त्यानंतर आजवर इंदिरा गांधी, स्टॉक होम वाटर्स अवॉर्ड, यूएन हॅबिटॅट अवॉर्ड, एनर्जी ग्लोब अवॉर्ड, कॉर्पोरेट सिटिज़न अवॉर्ड, लीडरशिप अवॉर्ड, ई आंतरराष्ट्रीय पातळिवरचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना डॉक्टरेट पदवी देखील मिळालि. पाठक यांचा समावेश आज जागतिक दर्जाच्या ५० समाजसेवकांमधे आहे. जमिनी पासून ते आकाशा पर्यंतची ही मजल म्हणजेच फिनिक्स भरारी...

सहावा टर्निंग पॉइण्ट आणि भविष्याचा वेध....
आज सुलभचे ३५००० वर समर्पित स्वयसेवक आहेत. आजपर्यंत १५००० सार्वजनिक संडास बांधले आहेत. फक्त भारतातच नव्हे तर १८ देशांमधे शौचायलय बांधाण्याचे काम सुरू आहे. आज सुलभ २० मिलियन डॉलर्सची नॉन प्रॉफिट सामाजिक संस्था आहे - म्हणजेच १०० ते १२५ करोडचा रेव्हेंयू असलेली नॉन प्रॉफिट संस्था आहे. यातूनच पाठक यांनी सुलभ इंटरनॅशनल पब्लिक स्कूल ची स्थापना केली, या शाळेत ६०% मुले भंग्याची आहेत तर ४०% इतर सामाजातील आहेत. मुले हे देशाचे भविष्य आहेत व त्यांना काबिल बनवणे हे आपले परम कर्तव्य आहे असे     डॉ. पाठक मानतात. सेवा हाच खरा धर्म - याची जान पाठक यांनी ठेवली आहे तसेच इतरांनाही यशस्वी होण्यास मदत करणे हेच खरे यश. सुलभ मधे काम करणारे बहुतांशी लोक भंगी समाजातील आहेत.


सातवा टर्निंग पॉइण्ट - पिक्चर अभी बाकी है......
बीन-पगाराच्या नौकरी पासून ते २० मिलियन डॉलर्सच्या संस्थेपर्यंत ४५ वर्षांचा प्रवास झाला आहे. फक्त भारतातच सुलभचा रोज लाभ घेणारे आज ३० लाखांच्या वर लोक आहेत. पण डॉ. बिंदेश्‍वर पाठक आजही म्हणतात, (पान ३ वर)
"आज पॉश मॉल्स मधे टाइम पास करणार्‍या मुलांचा एक स्तर आहे आणि घाण-कचर्यात जीवन घालविणार्‍या मुलांचाही एक स्तर आहे..... मी आज बराच पुढे आलोय, पण काम अजुनही बाकी आहे.....
डॉ. पाठक यांच्या कामातून मला एक धडा करियरच्या दृष्टीकोनातून अजुन महत्वाचा वाटतो तो म्हणजे, "प्रत्येक दिवस एक संधी आहे आणि प्रत्येक संधी एक टर्निंग पॉइण्ट..... प्रत्येक टर्निंग पॉइण्ट हा अनुभवांचा संग्रह आणि याशापयशांचा सारांश असतो."

हाय फाइव्स फॉर अवर टर्निंग पॉइण्ट

मित्रांनो यशाच्या परिभाषा नसतात म्हणूनच आपल्याला आपले यश आपल्याच पद्धतीने अंकित करावे लागते.      डॉ. पाठक यांच्या सक्सेस स्टोरीतून मला काही भाग करियर आणि लाइफ बद्दल सांगावेशे वाटातात...

1] अमाप पैसा किंवा प्रसिद्धी म्हणजे करियर वा यश नसून त्याहून बरेच काही आहे व ते म्हणजे निरंतर काम करणे आणि आपल्या उर्जेचि आणि उपयुक्ततेची उपलब्धता करून देणे असाही आहे. यशाचा मार्ग खडतर आहे आणि अपमान त्याचा जिवलग मित्र म्हणूनच धाडस, धैर्य आणि धीर आवश्यक आहे.

2] बना तो बदलाव जो तुम्हाला हवाय, आपल्याला बदल घडविण्यासाठी अमर्याद सामर्थ्याची, उदंड धैर्याची, आणि   निस्सीम धीराची प्रचंड गरज आहे. लोक काहीही म्हणोत आपली जी निश्चित मते आहेत त्यांना चिकटून राहा आणि मगच जग तुमच्या पायाशी लोळन घेईल.

3] आपल्यात असलेले कौशल्य सिद्ध करा, लायक बना आपली लायकिही सिद्ध करा, तेंव्हाच लोक तुम्हाला लाइक करतील.

4] करियर आणि राष्ट्र घडविण्यासाठी एक विचार फार प्रेरक आहे तो म्हणजे , "वाट पहाणे आणि वाट शोधणे यातला फरक ओळखा, ध्येय गाठायचे असेल तर कोणाच्या उत्तेजनापेक्षा आत्मबळानेच पुढे सरसवा"

5] अडथळा आला म्हणजे समजावं आपल्याला गती प्राप्त झाली आहे. एका जागेवर थांबणार्‍याला अडथळा कसा येणार? सरपटणार्‍या माणसांना कोसळण्याची भिती नसते. तेव्हा आपण का कोसळत नाही याचा विचार करा. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कधी ना कधी अपयशाचा सामना हा त्याला करावाच लागतो; पण ते कायमचे नसते, हे लक्षात ठेवायला हवे.

                   


निलेश गोरे,
ट्रेनर अँड साइकोलॉजिकल काउन्स्लर
वेलनेस फाउंडेशन,
भुसावळ ९९२२८५१६७८
Facebook.com/nileshbgorebsl