का कुणास ठाउक पण आयुष्यात काम करतांना "मन चंगा तो कठौति मे गंगा "
ही म्हण नेहमी आठवते आणि त्याची जादू अशी की कोणत्याही कामाचा शेवट हा आनंदात आणि सफलतेतच
झाला.
संत रोहिदास यांनी दिलेला
हा एक सफलतेचा मूळमंत्रच आहे जो फक्त व्यक्तिगत आयुष्यातच नव्हे तर व्यवसाय असो, करियर
असो वा रिलेशनशिप आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात हे वाक्य कमालीचे जादू करते, कारण
ते जोडल्या गेलेले आहे आपल्या मनाशी आणि कर्माशी.
स्पर्धेच्या या युगात मन
बर्याचदा खचते, पण ज्याचा मनावर ताबा आहे त्याला उशिरा का होईना मनाप्रमाणे रिज़ल्ट्स
नक्कीच मिळतात व त्यासाठी गुरू रोहिदास यांचे विचार खरोकर फलदाई आहेत. मनावर नियंत्रण
मिळवन्यासाठी संत रोहिदासांनी बरेच मार्गदर्शन
केले आहे.
मंत्र 1) मन चंगा तो कठौति मे गंगा : -
दुखी, अशांत किंवा भरकटलेल्या
मनाने कोणते काम किंवा कृती ही सफल होत नाही.
मन स्वच्छ, निर्मल आणि शांत
असेल तर गंगा आपल्या जवळ असल्या सारखेच आहे. मन आणि विचार हे निर्मल आणि प्रसन्न असतील
तर कोणत्याही समस्येवर समाधान सहज मिळते असे गुरू रोहिदास सांगतात.
अभ्यास
असो, नौकरी असो, व्यवसाय असो किंवा अजुन काहीही मन अस्थिर असेल तर लक्ष लागत नाही आणि
लक्ष लागले नाही तर उद्धिष्ठ साध्य होत नाही. आपण कोणत्या गोष्टीवर कितिपट लक्ष केंद्रित करतो त्यावरून आपल्याला कितिपट यश मिळ्नार हे समजते. लक्ष्य केंद्रित करणे म्हणजे एका वेळेस फक्त एकाच उद्देशाकडे पूर्णपणे लक्ष्य देणे आणि फक्त त्याचाच विचार करणे. लक्ष्य केंद्रित केल्यास एकाग्रताही वाढते आणि कार्यशीलताही.
मंत्र 2) एक कार्य, एक ध्यान :-
एकदा एका राजाने गुरू रोहिदास
यांना विचारले की तुमची प्रचीती आणि प्रसिद्धी एवढी कशी काय आहे की लोक लांबवरुन तुमच्या
कडे जोडे शिवण्यासाठी येतात?
रोहिदास म्हणाले की मी तर
फक्त कर्तव्य प्रथम ठेवतो, माझ्या कामावर पूर्ण प्रेम करतो आणि प्रत्येक काम हे प्रेमाने
व आदराने करतो आणि तो पर्यंत फक्त एकाच कामात ध्यान लावतो जो पर्यंत ते पूर्ण होत नाही.
मी तेंव्हाच आनंदी होतो जेंव्हा
मी कामात पूर्ण ध्यान देतो, आणि रहस्य
हेच आहे की आनंदात केलेले प्रत्येक काम हे इतरांना आनंद देत असते.
मी माझ्या कामात पूर्ण ध्यान लावतो व आनंदी
राहतो व त्यामुळे माझे काम सर्वोत्तम बनते, म्हणून कदाचीत लोक माझ्या कडे येतात.
इतरांना आनंद देणे, पूर्ण सेवा देणे आणि सर्वांना एकसमान मानने हाच माझा धर्म
आहे.
जेंव्हा आपण एखाद्या कामात स्वत:ला पूर्णपणे समर्पित करतो तेव्हाच सर्वोत्तम कार्य घडत असतं आणि आपले कार्य पाहूनच जग आपल्याला संधी देत असतं. आपल्या
करियर आणि व्यवसायासाठी सुद्धा खरच हे विचार खूपच उपयोगी आहेत.
मंत्र 3) गंगा ही पण गुरू :-
संत रोहिदास सांगतात की गंगा
ही पण एक महान गुरू आहे जी खूप काही शिकवते आणि म्हणूनच लोकांची आस्था देखील आहे. गंगा
आपणास acceptance ची शिकवण देते म्हणजेच स्वीकार करणे. गंगा आपणास स्पीड आणि मुव्ह्मेन्ट शिकवते म्हणजेच गती आणि चालत राहणे, गंगा कठीण प्रदेशातून
मार्ग काढत पुढे सरकत जाते तसेच आपणही करावे, प्रवाह थांबत नाही त्याच प्रमाणे प्रगती हवी असेल तर आपणही
थांबता कामा नये असे गुरू रोहिदास सांगतात. खरच आहे ते, "जो थांबला तो संपला".
गंगा ही GENEROUS आहे म्हणजेच उदार आहे ती उच्च-निच्च
आणि आमिर - गरीब हा फरक करत नाही आणि म्हणूनच ती महान आहे. फरक करणे, भेद भाव करणे
हे नात्यांमधील आणि व्यवसायामधील अपयाशाचे मोठे कारण आहे. आयुष्यात उत्तुंग शिखर गाठायचे असतील तर उदार होणे
देखील तितकेच महत्वाचे आहे असाही संदेश गुरू रोहिदास देतात आणि म्हणतात की गंगा ही
पण माझी गुरू आहे. खरंच आपल्याही आयुष्यात
हे उपयुक्त ठरते.
"क्लॅरिटी ऑफ थॉट अँड प्यूरिटी ऑफ गंगा आर सेम"
म्हणजेच विचारांची शुद्धता
आणि गंगेची पवित्रता यांची शक्ति एकसमान आहे असा विश्वास गुरू रोहिदास यांचा होता. विचारांच्या शुध्दतेतूनही तोच चमत्कार घडू शकतो जो लोकांना गंगेच्या पवित्रतेतून
अपेक्षित आहे. गंगेचे पाणी स्थिरावलेले असेल तरच लोक गंगेचा आनंद घेऊ शकतात, पण पाणी
उसळलेले आणि खवळलेल असेल तर आनंद नाही घेता येत त्याच प्रमाणे, मन निर्मल व विचार आणि भावना स्थिर असतील
तरच आपण आयुष्याचा आनंद घेऊ शकतो.
गुरू रोहिदास यांनी दिलेले
हे मंत्र खरच आयुष्याला वळण आणि आकार देणारे आहेत, एका संताचे तीन करियर मंत्र हे तीनशे
पटीने यश वाढवणारे आहेत. आयुष्यात गुरू खरच
महत्वाचा असतो. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. अपार यश प्राप्तीसाठी आपल्याला संतांची शिकवण ही खूप महत्वाची ठराणारी आहे. थोर
संतांचे विचार हे खरच विकास घडवून आणू शकतात फक्त आपल्याला विश्वास ठेवणे गरजेचे आहे.
धन्यवाद,
निलेश गोरे,
ट्रेनर अँड साइकोलॉजिकल काउन्स्लर
वेलनेस फाउंडेशन,
भुसावळ – ९९२२८५१६७८
www.Facebook.com/nileshbgorebsl
No comments:
Post a Comment